
सावंतवाडी : जिल्हाधिकारी यांची बदली ही तडकाफडकी करण्याचे कारण राजकोट येथिल घटनेकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. पालकमंत्री यांचा यात हात नसेल तर त्यांनी संबंधितांना निलंबित करावे. मात्र, ते दोषींना वाचवत आहेत असा आरोप उबाठा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांनी केला. तर पुतळा पडल्यावरून माफी मागणारे पंतप्रधान, मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांचे राजीनामे घेणार का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे यांना गणपती पूर्वी पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अन्यथा महाविकास आघाडी गणपती नंतर रत्यावर उतरणार असा इशारा ठाकरे सेनेचे नेते सतिश सावंत यांनी दिला. राणेंनी राजकोट किल्लायावर केलेल्या वक्तव्यावर केसरकरांनी आपली भुमिका स्पष्ट करावी असे आवाहन श्री सावंत यांनी करत केसरकर यांनी जनतेच्या विकासाच्या नावाखाली केसरकांनी खोके घेऊन स्वतःचा विकास केल्याच आरोप केले. वाईटातून चांगले केसरकरांचेच झाले असा टोला त्यांनी हाणला.
दरम्यान, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपली प्रतिमा राजकोट प्रकरणानंतर काय राहिली याचा विचार करावा. पालकमंत्री यांचा यात हात नसेल तर जे दोषी आहेत त्यांना निलंबित करावे. ते होत नसून अधिकाऱ्यांना वाचवण्याच काम होत आहे असं श्री. सावंत म्हणाले. यावेळी विधानसभा प्रुमख रूपेश राऊळ, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, युवा सेना तालु उत्तम लोके ,माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आदी उपस्थित होते.