सिंधुदुर्गात गद्दारांना स्थान नाही : व्हिक्टर डॉंन्टस

Edited by: विनायक गावस
Published on: October 27, 2023 12:12 PM
views 127  views

दोडामार्ग : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दोडामार्ग तालुक्यात पार पडत आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते, जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डॉंन्टस यांनी आपलं मत व्यक्त केले.

ते म्हणाले, आदरातिथ्य कसं करावं हे सुप्रिया सुळे यांच्याकडून शिकाव लागेल. आपला जिल्हा स्वाभिमानी जिल्हा आहे. विचारवंतांना इथून निवडून दिलं आहे. इथे गद्दारांना स्थान नाहीय. भाजपला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काळात पुन्हा उभारी घेईल. अर्चना घारे चांगल काम करत आहेत. पाच वर्षांत लोकसेवेत काम केलं. आजची उपस्थितीच सर्वकाही सांगून जात आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास क्रांती घडेल असा विश्वास व्हिक्टर डॉंन्टस यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी खा. सुप्रिया सुळे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, ज्येष्ठ नेते सुरेश दळवी, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, व्हिक्टर डॉंन्टस, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, निरीक्षक शेखर माने, नम्रता कुबल, महीला अध्यक्ष रेवती राणे, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, संदीप गवस, सावली पाटकर,प्रदीप चांदेलकर, महादेव देसाई, ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, गौतम महाले, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, सागर नाईक, सुभाष लोंढे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते