विद्युत अपघात टाळण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Edited by: विनायक गावस
Published on: November 26, 2023 14:34 PM
views 114  views

सावंतवाडी : विद्युत अपघात टाळण्यासाठी विज महावितरणच्या सावंतवाडी विभागाच्यावतीने बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना विद्युत वाहिन्यांवर सुरक्षित देखभाल व दुरुस्तीसाठीचे एक दिवशीय तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांमध्ये वाहिन्यांवर सुरक्षित काम करण्याची प्रवृत्ती वाढण्यासह भविष्यात विद्युत अपघात टाळण्यासाठी विज महावितरणचे सावंतवाडीचे उप कार्यकारी अभियंता के ए चव्हाण यांच्या विनंतीवरून या एकदिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

सांगली येथील लघु प्रशिक्षण केंद्राचे उपकार्यकारी अभियंता संदीप माहुलकर यानी या बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी सावंतवाडीचे उप कार्यकारी अभियंता के ए चव्हाण, सहाय्यक अभियंता पृथ्वीराज चव्हाण, शाखा अभियंता अनिकेत लोहार, पियुशी चांदेरकर, श्री मोरे यांच्यासह एकूण  वीज वितरण चे ८० बाह्य स्त्रोत कर्मचारी उपस्थित होते.