शेतकऱ्यांसाठी १९ जानेवारीला प्रशिक्षण !

Edited by: संदीप देसाई
Published on: January 16, 2024 13:44 PM
views 66  views

दोडामार्ग : कृषि पदवी व पदविकाधारक संघटना (दक्षिण सिंधुदुर्ग), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग, महाराष्ट्र शासन कृषि विभाग (सिंधुदुर्ग).आणि कृषि विज्ञान केंद्र किर्लोस - सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व प्रदर्शन दिनांक १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

हे आयोजन सासोली येथील  मंदार मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते दु. ३ वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी हळद, मसाला पिके, काजू, नारळ, सुपारी, औषधी वनस्पती, अननस, बांबू, अळांबी लागवड या विषयावर तज्ञांचे सखोल मार्गदर्शन असणार आहे. तरी प्रशिक्षण व प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२२४३३२९६ / ७८७५४८५२२७ / ९०२१७७३९४७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.