पालकमंत्र्यांचा रेल्वे प्रवास...!

Edited by:
Published on: July 17, 2023 13:57 PM
views 503  views

सिंधुदुर्ग : सीएसटी स्टेशनवर ७.१८ च्या बदलापूर लोकल फर्स्ट क्लासच्या डब्यात सात, आठ गणवेशातले पोलीस सुरक्षा कर्मचारी होते. शेजारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण बसलेले होते. डोंबिवलीचे आमदार असणारे रवींद्र चव्हाण यांनी संध्याकाळच्या वेळी सीएसटी वरून डोंबिवलीला गाडीने रस्ता मार्गे जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय होतो. तेवढ्यासाठीच सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे त्यांनी केलेला प्रवास अनेकांना भावला. इतर सर्व प्रवाशांना कल्पनाही नव्हती राज्याचा एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री सर्वसामान्य रेल्वे प्रवाशासारखा प्रवास करतो आहे.