
वैभववाडी : घाटरस्त्याच्या कामानिमित्त गेले सहा महिने बंद असलेला करुळ घाट गणेश चतुर्थीपुर्वी वाहतूकीसाठी सुरू व्हावा अशी मागणी वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी आज तहसीलदार सुर्यकांत पाटील यांना दिलं.
तळेरे-गनबावडा या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व कॉक्रीटीकरणाचे काम सुरू आहे.याकरिता करुळ घाट गेली सहा महिने बंद आहे.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक भुईबावडा घाटमार्गाने वळविली आहे.परंतु याच मार्गाने ओव्हरलोड अवजड वाहतूक सुरू आहे.त्यामुळे भुईबावडा मार्ग नादुरुस्त होण्याची शक्यता अधिक आहे.गणेश उत्सव काळात करुळ,भुईबावडा हे दोन्ही घाट सुरु असणं गरजेचं आहे.त्यामुळे सध्या सुरू असलेले करुळ घाटातील काम जलदगतीने पुर्ण करुन गणेश चतुर्थीपुर्वी हा घाट वाहतुकीसाठी खुला व्हावा.तसेच भुईबावडा घाटातून सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक फोंडा घाट मार्गे वळविण्यात यावी अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर, सचिव सुरेंद्र नारकर, अरविंद गाड,नितेश पाटील,बाळू शिरावडेकर, श्री.पटेल,संजय लोके , रविंद्र मोरे यासह व्यापारी बांधव उपस्थित होते