
कणकवली : मुसळधार पावसामुळे मंगळवारी रात्रभर बंद असलेला फोंडाघाट अखेर बुधवारी सकाळच्या सुमारास सुरू झाला. फोंडा - कोल्हापूर मार्गावरील राधानगरी तालुक्यातील एका गावामध्ये रस्त्यावर पाणी आल्यामुळे राधानगरी तहसीलदार व कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सदर रस्ता बंद ठेवला होता.
परिणामी या रस्त्यावरील वाहतूक रात्रभर थांबविण्यात आली होती. अर्थातच रात्रभर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर बुधवारी सकाळच्या सुमारास रस्त्यावरील पाणी ओसरले व त्यानंतर घाट वाहतुकीस सुरू करण्यात आल्याची माहिती कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.