
सावंतवाडी : गोवा येथून आंबोली येथे जाणाऱ्या तेलंगणा येथील पर्यटकांच्या गाडीचा दाणोलीत अपघात झाला. त्यांच्या स्विफ्ट कारची दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला धडक बसल्याने हा अपघात झाला. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.
सुदैवाने रस्त्यालगत कोणी उभे नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातात स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. यात किरकोळ जखमी झालेल्या पर्यटकांना सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे .