
मालवण : मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेमधून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतील आर्या अजित राणे व श्रेयस चंद्रशेखर बर्वे या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १०० टक्के गुण मिळवून प्रशालेसह मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावीत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. या शाळेतून निशांत शरद धुरी याने ४८९ गुण मिळवीत द्वितीय क्रमांक मिळविला. तर अमूल्या हेमंत साटम हिने ४८८ गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला. आर्या समीर लवू (४८४) हिने चतुर्थ क्रमांक तसेच सायली विनायक भिलवडकर (४८१) व जिज्ञासा शिवराम सावंत (४८१) यांनी पाचवा क्रमांक मिळविला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश मयेकर, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.