
देवगड : तांबळडेग समुद्र किनारी दक्षिणवाडा येथील श्रीदेव महापुरुष मंदिराचा १३ मे रोजी १६ वा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे, या निमित्त सकाळी १० वा.श्री सत्यनारायण महापूजा आरती, दुपारी १२ ते ३ फौजदार श्री सागर सुभाष मालडकर यांच्या वतीने महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ५ हळदी कुंकू,सायंकाळी ६ ते ८ बुवा प्रमोद सनये, बुवा श्रीरंग केळूसकर,बुवा संजय मालडकर यांची भजने, रात्रौ ९ वा सन्मान आणि आभार प्रदर्शन,रात्रौ १० वाजता तांबळडेग मर्यादित डान्स,आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या धार्मिक सोहळ्याला सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन दक्षिणवाडा विकास मंडळा (रजि.) तांबळडेग यांच्या वतीने करण्यात आले आहे.