
वैभववाडी : श्री अंबरनाथ महाराज मठ सांगुळवाडी येथे उद्या (ता.२८ ) श्री स्वामी मारुती महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन दत्त दरबार ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या पुण्यतिथी निमित्त दत्त मठात सकाळी १०. ०० ते ०१.०० वाजेपर्यंत समाधी स्थानावर पंचामृत अभिषेक, दुपारी ०१ वा.१५. आरती, दुपारी ०१.वा.३०.मि. महाप्रसाद असं धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.