सांगुळवाडी दत्त मठात उद्या माघी गणेश जयंती...!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 12, 2024 07:21 AM
views 184  views

वैभववाडी : अंबरनाथ राणे महाराज मठ दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने येथील मठात माघी गणेश जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश जयंती निमित्त सकाळी ०५ ते ११. ०० नित्य पूजा, सकाळी ११ ते १२.३० पंचामृत महाअभिषेक, दुपारी १२.३० वा. गणेश जन्मोत्सव, दुपारी ०१. १५ वा. आरती, दुपारी ०१. ३० वा. महाप्रसाद, दुपारी ०३ते०५ : ००वा. हळदीकुंकू समारंभ, रात्रौ ०८ वा. सुस्वर भजने आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमांसाठी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.