वैभववाडीत उद्या 'होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न'

उबाठा शिवसेनेचं आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 05, 2023 15:28 PM
views 257  views

वैभववाडी : शिवसेना (उ.बा.ठा)पक्षाच्या वतीने  उद्या शुक्रवार, दि. ६ ऑक्टोबर, २०२३ सकाळी ११.०० वाजता  "होऊ दे चर्चा विचारा प्रश्न" अभियानाची कॉर्नर  सभा  संभाजी चौक वैभववाडी येथे आयोजित केली आहे. या सभेला शिवसेना सचिव खा. विनायक राऊत , अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, महिला आघाडीच्या उपनेत्या  मीनाताई कांबळी, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली - देवगड विधानसभाप्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हा अधिकारी सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटिका  नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख- नंदू शिंदे, जिल्हा कार्यकारणी- सदस्य संदीप सरवणकर हे उपस्थित राहणार आहेत.

या सभेला शिवसेना , युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी - माजी लोकप्रतिनिधी जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच व तमाम  शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  तालुकाप्रमुख- मंगेश लोके, युवासेना जिल्हा चिटणीस- स्वप्निल धुरी, शहरप्रमुख शिवाजी राणे यांनी केले आहे.