पोलीस बंदोबस्तात टोल वसुली !

कृतीसमिती टोलवर धडकणार
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 14, 2023 09:50 AM
views 159  views

कणकवली : सकाळी आठ वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात झाली असून सिंधुदुर्गवासियांच्या विरोधाला झुगारून ही टोल वसुली पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली आहे. थोड्याच वेळात सिंधुदुर्ग वासियांसह टोल मुक्त कृती समिती टोल नाक्यावर धडक देणार असून सिंधुदुर्ग वासियांना टोलमुक्ती मिळाल्याशिवाय टोल सुरू करू देणार नाही असा इशारा या कृती समितीने दिला होता. तसेच सर्वपक्षीय एकवटून एकत्र येऊन या टोलला विरोध करणार असल्याने वातावरण तणावाचं निर्माण होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.