
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा नियोजन समितीची दिनांक 5 रोजी होणारी सभा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत असून आगामी सभेची तारीख कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कळविले आहे.
जिल्हा नियोजन समितीची सभा सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली 5 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन) जिल्हारधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्याात आली होती.