
दोडामार्ग : पाटये येथील श्री देवी सातेरीचा वर्धापन दिन आज गुरुवारी २३ एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्त आज सकाळपासून देवीची पूजा विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसाद तसेच रात्री जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा ब्रम्हकुंड परिक्रमा हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटी व गावाकडून करण्यात आले आहे.










