आज सावंतवाडीत भाजपची संघटन पर्व बैठक

Edited by:
Published on: February 21, 2025 11:15 AM
views 172  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची भाजपची संघटन पर्व बैठक आज शुक्रवारी २१ फेब्रुवारी रोजी ४.३० वा. बॅरिस्टर नाथ. सभागृह येथे होणार आहे. या बैठकीला पालकमंत्री तथा मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी आदी पदाधिकारी या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ले आदी तिन्ही तालुक्यातील विरोधी पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी प्रवेश करणार असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी केले आहे .