
वेंगुर्ला : शिरोडा वेळागर येथील बहुचर्चित ताज रिसॉर्टचे भूमिपूजन पर्यटन मंत्री गिरीश महाजन, खासदार नारायण राणे व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित आज दुपारी ३.३० वाजता होणार आहे. गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून शिरोड्या पासून वेंगुर्ला शहरापर्यंत या भूमीपूजनाचे बॅनर झळकत आहेत.