
सावंतवाडी : हो, मी सहा महिने जेलमध्ये होतो. त्या केसशी माझा संबंध असल्याचे सिद्ध करावं, मी राजकारण सोडतो असं आव्हान माजी आमदार राजन तेली यांनी केसरकर यांना दिलं. जिल्ह्यातील एकही जेल पाहिलं नाही असं नाही. जनतेसाठी आम्ही जेल भोगल अस विधान श्री.तेली यांनी केल. भाजपच्या कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते.
जोपर्यंत आमदार बदलत नाही तोपर्यंत सावंतवाडीचा विकास होणार नाही. त्यामुळे आता संधी आली आहे. कार्यकर्त्यांवर कसा अन्याय होतो ते वरच्या लोकांना देखील समजलं पाहिजे.केसरकरांकडून पैशाच वाटप होणार आहे. त्यामुळे पैसे घ्या, लक्ष्मीचा स्वीकार करा. पण, आमचं ठरवलंय हे ध्यानात ठेवा असं मत माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केले. मी ६ महिने जेलमध्ये होतो त्या केसशी माझा संबंध असल्याचे सिद्ध करावं, मी राजकारण सोडतो असं आव्हान केसरकर यांना दिलं. जिल्ह्यातील एकही जेल पाहिलं नाही असं नाही. जनतेसाठी आम्ही जेल भोगल असंही श्री. तेली म्हणाले.