
देवगड : देवगड मंडलाच्यावतीने शहरात भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी भव्य तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणार आहे.
भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी देवगड मंडलाच्यावतीने ही यात्रा काढण्यात येणार आहे. भारत माता की जय, वंदे मातरम, अशा घोषणा देत ही तिरंगा यात्रा निघेल, तरी सर्व देशप्रेमी नागरिकांनी या यात्रेत सहभागी असे आवाहन करण्यात आले आहे. देवगड सातपायरी, उद्यान गणेश मंदिर येथून उद्या रविवारी सकाळी १० वा.. ही यात्रा निघेल आणि देवगड एसटी स्टॅन्ड येथे ही तिरंगा यात्रा समाप्त होईल.