
दोडामार्ग : तिलारी घाटातून एसटी वाहतुकीसाठी घाट मार्ग सक्षम आहे की नाही याची आज कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या शिष्ट मंडळाने प्रत्यक्ष एसटी बस घेऊन पाहणी केली. व या संदर्भातील अहवाल कोल्हापूर जिल्हाधिकारी देणार असल्याचे उपस्थित प्रांताधीकारी एकनाथ कलबांडे यांनी सांगितले. तब्बल 4 महिन्यांनी घाटातून एसटी बस खाली उतरली मात्र एसटी बस सुरु करण्या संदर्भात कोल्हापूर प्रशासनाची सकारात्मक आहे काय? या बाबत चर्चा सुरु होत्या. प. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकारी आता काय निर्णय देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तिलारी घाट अवजड वाहतुकीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी 31 ऑक्टोबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. यामुळे या घाट मार्गातून कोल्हापूर कर्नाटक गोव्याकडे जाणारी एसटी वाहतूक सुद्धा बंद झाली. याचा फटका सर्व सामान्य नागरिक, प्रवाशी शाळकरी मुले यांना होऊ लागला. याच पार्शवभूमीवर दोडामार्ग सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना एसटी बस सुरु करा या संदर्भत पत्रव्यवहार देखील केले. तरी देखील कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी गांभीर्य घेत नसल्याने अखेर प्रवीण गवस व कोदाळी येथील माजी सरपंच अंकुश गावडे व इतर ग्रामस्थांनी काल सोमवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषणास सुरवात केली. मंगळवारी प्रांत, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटीचे अधिकारी येऊन प्रत्यक्ष पाहणी करतील असे कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्र दिले त्यावेळी उपोषण तात्पुरते मागे घेण्यात आले होते.
त्याच धरतीवर आज मंगळवारी दुपारी 3.30 वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी यांचे शिष्टमंडळ यांनी एसटी बस घेउन प्रत्यक्ष गाडीतूनच पाहणी केली. कोदाळी ग्रीन हिल येथून एसटी चालवत विजघर चेकपोस्ट पर्यंत चाचणी केली यावेळी आलेले अधिकारी आपल्या गाडीतून खाली उतरलेच नाही गाडी तशीच फिरवून या संदर्भाती अहवाल कोल्हापूर जिल्हाधिकारी देणार असल्याचे प्रांताधिकारी एकनाथ कालबांडे यांनी सांगत आपल्यावरची जबाबदारी झडकवत निघून गेले. मात्र यावेळी सर्व ग्रामस्त व प्रवीण गवस यांनी आक्रमक भूमिका घेत निर्वाणीचा इशारा दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो, दत्ताराम देसाई, कोदाळी माजी सरपंच अंकुश गावडे, पंकज देसाई आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर प्रशासनाचे आलेले शिष्ट मंडळ हे सार्वजनिक बांधकाम चे कार्यकारी अभियंता मुल्ला यांचाकडून अभ्यास करू आलेले आहे. आणि सर्व अधिकारी हे मॅनेज झालेले आहे असा थेट आरोप चंदगड तालुक्यातील कोदाळी गावाचे माजी सरपंच अंकुश गावडे यांनी केला आहे. सार्वजनीक बांधकाम विभाग हे पूर्णपणे भ्रष्ट आहे. त्यांच्यामुळे हा घाट वाहतुकीस बंद झाला आहे. आणि त्यांना हा घाट मार्ग पूर्णपणे बंद करायचा आहे म्हणून हा सर्व खाटाटोप चालला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
एसटी सुरु न झाल्यास तिलारी घाटच बंद : सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस
दरम्यान पाहणी झाल्यावर एसटी बसची चाचणी झाल्यावर अधिकाऱ्यांच्या जरतर च्या भूमिकेवर प्रवीण गवस आक्रमक झाले. व या घाटातून एसटी बस सुरु न झाल्यास हा तिलारी घाट मार्ग सर्वच वाहतुकीसाठी बंद करणार असल्याचा धमकी वजा इशारा आलेल्या शिष्ट मंडळाला दिला आहे.
घाटात चाचणी साठी एसटी चालक नवा कसा ?
४० वर्षांपूर्वी या घाटातून चंदगड आगाराची पहिली एसटी धावली. ज्या घाटातून निरंतर एसटी धावली, तेथे प्रात्यक्षिक घेताना एसटी आणायची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत एसटी विभाग व सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांचे हे साटेलोटे आहे. ज्या घाटात एसटीला अनुभवी चालक लागतो, त्या घाटातून यांनी मुद्दाम नवखा चालक आणला, असा आरोप अंकुश गावडे यांनी प्रांताधिकारी यांच्यासमोर केला. घाटातून एसटी बंद करण्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग पूर्णपणे जबाबदार असल्याचेही उपस्थित म्हणाले.
अधिकाऱ्यांचे कटकारस्थान हाणून पाडू
प्रत्यक्ष चाचणी करून अधिकारी जात असताना प्रवीण गवस, दत्ताराम देसाई, अंकुश गावडे व ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांच्या गाडीकडे जात त्यांना चर्चा करण्याची विनंती केली. ज्या घाटातून ४० वर्षे एसटी सेवा सुरू आहे, त्या घाटातून एसटी बंद पडण्यास सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदगडचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप प्रवीण गवस व अंकुश गावडे यांनी केला. या अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांचे कोणतेही सोयर सुतक नसून एसटी वाहतुकीसाठी हा घाट कायमचा बंद करण्याची त्यांची धारणा आहे. मात्र आम्ही त्यांचा हा कट हाणून पडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रवीण गवस म्हणाले. या बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना घाटाविषयी खोटा अहवाल दिला आहे, असा आरोप यावेळी प्रवीण गवस यांनी केला. यावेळी बांधकाम उपविभागाचे अधिकारी श्री. मुल्ला हे निरुत्तर झाले. आगार व्यवस्थापक सतीश पाटील यांनी घाटातील अनेक वळणावर समोरचे दिसत नसल्याचे उपस्थितांना सांगितले. यावेळी ही जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभागाची असून त्या अधिकाऱ्यांनी जाणून बुजून रस्त्यालगतची साफसफाई केली नसल्याचे म्हणाले. दरम्यान अधिकाऱ्यांनी गाडीत बसून उपस्थितांना उत्तरे दिली.