
सिंधुदुर्गनगरी : रखलेला शिक्षक वेतनश्रेणीच्या प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यानी दिलेल्या शब्दाप्रमाणे दोन दिवसात शब्द पाळला व शासन निर्णयाप्रमाणे त्या ८० पदवीधर शिक्षकांना त्यांच्या हक्काचे वेतनश्रेणी मंजूर केली व हा प्रश्न कायमचा सोडविला. तसे आदेशही त्यांनी दिले. व शिक्षकांच्या उपोषणाला न्याय दिला. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जीपचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांची शिष्टाई ही फार महत्वपूर्ण ठरली अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी खास पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
या ऐशी गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणी मंजुरीबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेत समोर तीन दिवस सुरू झालेले शिक्षकांचे उपोषण स्थगित ठेवण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी शिक्षक संघटना प्रशासन यांच्यात चांगली शिष्टाई केली. शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील गणित विज्ञान पदवीधर असलेल्या ७६ शिक्षकांना एस-१४ वेतनश्रेणी दिली जावी अशी गेली दोन वर्षे मागणी होती. प्रशासनाने या प्रश्नाकडे कानाडोळा केला होता. मात्र आंदोलन सुरू झाले व याची गंभीर देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली व हा प्रश्न मार्गी लावला. असेही राजन कोरगावकर यावेळी म्हणाले.
दि.10 जुलै पासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व माजी जि. प.अध्यक्ष काका कुडाळकर यांनी संघटना व प्रशासन यांचेशी चर्चा करून यशस्वी शिष्टाई केली व हा प्रश्न सकारात्मकरित्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला. मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख शिक्षणाधिकारी डॉक्टर गणपती कमळकर या प्रश्नाला चांगला प्रतिसाद दिला व सकारात्मक निर्णय घेतला. भाजप नेते खासदार नारायण राणे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही या प्रश्न लक्ष घातले त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी समाधान व्यक्त केले.
आज सायंकाळी उशिरा ८० शिक्षकांना आदेश मिळाल्यानंतर प्राथमिक शिक्षक पतपेढी येथे संबंधित शिक्षक व शिक्षक समिती पदाधिकारी यांनी एकच जल्लोष केला. आदेश प्राप्त होताच शिक्षक समितीने काका कुडाळकर,प्रभाकर सावंत,जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,उपाध्यक्ष अतुल काळसेकर,अनंतराज पाटकर यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी शिक्षक समितीचे ,जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,सरचिटणीस तुषार आरोसकर,पतपेढी अध्यक्ष नारायण नाईक,शिक्षक नेते भाई चव्हाण,भाऊ आजगावकर,नामदेव जांभवडेकर,चंद्रसेन पाताडे, सचिन मदने,रुपेश गरुड,संदीप मिराशी,राजेंद्रप्रसाद गाड,जयेंद्र चव्हाण,ईश्वरलाल कदम,आप्पा सावंत,गणेश आजबे,सचिन ठाकरे,रवी चव्हाण आदी उपस्थित होते.