
वेंगुर्ला : अतिवृष्टीमुळे वेंगुर्ला मठ सातेरी मंदिर देऊळवाडी येथील सिध्दार्थ नगर रस्ता वरील संरक्षक भिंत कोसळल्याने येथील सात गावाचा संपर्क तुटण्याची भीती होती. याची दखल महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यानी घेत तत्काळ १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे सात गावाचा मठ गावाशी तुटणारा संपर्क पूर्ववत झाला आहे या कामाचे शुभारंभ बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर याच्या हस्ते झाला.
या शुभारंभ प्रसंगी मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, मारुती वाघे, श्री कांडरकर, श्री गावडे आदी उपस्थितीत होते. नितीन मांजरेकर याच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रथम मठ स्वयंभू मंदिरात श्रीफळ अर्पण करण्यात आले. मठ सरपंच ठाकुर यांनी गावातील विविध विकास कामाबाबत आमदार दीपक केसरकर याना निवेदन देण्याकरिता माजरेकर यांच्याकडे सुपूर्द केले. या कामाबद्दल ग्रामस्थ व मठ ग्रामपंचायतीने दीपक केसरकर याचे विशेष आभार मानले.