भाजपा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून आज भजन साहित्य संच वाटप

Edited by: विनायक गांवस
Published on: September 04, 2024 08:59 AM
views 271  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी व संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहनपर मोफत भजनी साहित्य संच वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज बुधवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी ३ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती संदीप गावडे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.

श्री गणेश चतुर्थी सण तोंडावर आहे. कोकणातील सर्वात मोठा उत्सव म्हणून आपण त्याकडे पाहतो चाकरमाने मोठ्या संख्येने या उत्साहासाठी आपल्या गावात येत असतात गावोगावी प्रत्येक वाडीवस्तीवर घरोघरी आरत्या भजन मोठ्या उत्साहात केली जाते. भजन म्हटलं तर एक धार्मिक वारसा आणि सांस्कृतिक चळवळ या ठिकाणी गेली कित्येक वर्ष पाहायला मिळते याच धार्मिक चळवळीला बळ देण्यासाठी गावातील भजन मंडळांना स्वखर्चातून भजन साहित्य संच देण्याचा मानस गावडे यानी केला आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीची अर्ज करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यातील सावंतवाडी तालुक्यात २८७ परिपूर्ण अर्जापैकी १११ मंजुर झाले. वेंगुर्ला तालुक्यात १३१ परिपूर्ण अर्जापैकी ४३ मंजूर तर दोडामार्ग तालुक्यात ५४ परिपुर्ण अर्जापैकी २९ मंजुर झाले. या सर्व मंडळाना तबला १ नग, पखवाज १ नग, टाळ ४ नग असे भजनी साहित्य देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज दुपारी तीन वाजता सावंतवाडी शहरातील बॅरिस्टर नाथ पै सभागृहात होणार आहे. तसेच विविध कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले आहेत.