हवामान बदलामुळे देवगड हापूस वर थ्रिप्सचा प्रादुर्भाव..!

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 08, 2024 20:05 PM
views 243  views

देवगड : हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर सातत्याने होत आहे. सध्या मोहर व फळधारणेवर प्रादुर्भाव झाल्याने पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. हवामानातील बदलाचा अंदाज घेत दर दहा ते पंधरा दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी लागत आहेत.कीटकनाशके महागडी असल्याने खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

देशातील नव्हे तर परदेशी नागरिकांना भुरळ घातलेल्या देवगड हापूस आंबा पिकावर जिल्ह्याचे अर्थ करन अवलंबून आहे. आंबा उत्पादन खालावत असल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसत असून बागायतदारांची आर्थिक घडी विस्कटली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने ऑक्टोंबर हिट चांगली जाणवली त्यामुळे नोव्हेंबर मध्ये थंडी सुरू होताच आंब्याला मोहर सुरू झाला.अवकाळी पावसामुळे मोहरावर परिणाम झाला. काही ठिकाणी मोहर खराब झाला आहे.