
कुडाळ : कोकणातील पहिल्या भव्य दिव्य दहीहंडीचा थोड्याच वेळात सुरू होणार आहे. माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत 5 लाख 55 हजार 555 बक्षीसाचा मानकरी कोण ठरणार हे समोर येणार आहे.
या दहीहंडीचे आकर्षण असलेल्या हास्य जत्रा फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी, नृत्यांगना मानसी नाईक, हास्य सम्राट प्रेम भाऊ कदम, जय मल्हार फेम देवदत्त नागे उपस्थित झाले असून थोड्याच वेळात ते मंचकावर येणार आहेत. याचवेळी मेरी माटी मेरा देश या उपक्रमाचाही शुभारंभ होणार आहे. माजी खासदार निलेश मंचकावर उपस्थित असून गोविंदा पथकेही दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात या भव्य दिव्य दहीहंडीचा थरार कुडाळ वासियांसह जिल्हा वासियांना पाहायला मिळणार आहे. या भव्य दिव्य दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी अबाल वृद्धानी गर्दी केली आहे.