
सावंतवाडी : शहरालगतच्या कोलगाव येथे गांजा सेवन केल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. ही कारवाई सावंतवाडी पोलिसांकडून आज सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. सापळा रचून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी याला दुजोरा दिला असून अजूनही काहीजणांचा शोध सुरू आहे .