व्यावसायिकाला धमकी - बदनामी ; पोलीस ठाण्यात तक्रार

Edited by: मनोज पवार
Published on: July 30, 2025 11:49 AM
views 186  views

मंडणगड :  व्यावसायिक विजय काते यांना पत्रकार असल्याचे भासवून त्यांची आर्थीक पिळवणुक करुन जीवीताचे भय देणाऱ्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलीसांना एन.सी. आर. नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.

या संदर्भात श्री. काते यांनी दिलेल्या माहीतीनुसार सोशल व प्रिंट मिडीयाचा पत्रकार असल्याचे सांगुन व बदनामी करणारा मजकूर समीर बामुगडे या व्यक्तीने त्यांचे विरोधात प्रसिध्द केला.  यानंतर काते यांना फोन वरून धमकी देत आगामी काळात मजकूर छापू नये या करिता पैशाची मागणी केली व न दिल्यास बदनामी करून जीवातास नुकसान करण्याचे भिती दाखवली असल्याचे काते यांनी सांगितले. यावर काते यांनी संबंधीत व्यक्तीस मंडणगड येथे बोलावून समज दिली व त्यांनी मागणी केलेले पैसे ही दिले पण हा प्रकार बंद न केल्याने त्यांचे विरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात त्या विरोधात तक्रारही केली. या तक्रारीला घाबरुन या व्यक्तीने आपण हा प्रकार वाकवली येथील विशाल मालवणकर, संजय गिरी गोसावी यांचे सांगण्यावरुन केलेला असल्याचे व त्यांनी यासाठी मला पैसे व माहीती दिलेली असल्याचे पोलीसांकडे लेखी जवाब लिहून दिलेले असल्याचे श्री. काते यांनी यावेळी सांगीतले. त्यामुळे मंडणगड पोलीसांनी एनसीआर दाखल करून घेतला आहे. मात्र त्या व्यक्तीने आपल्या गावी परतून एका महिलेची बदनामी करत व काते यांचे विरोधात पुन्हा खोट्या तक्रारीचे सत्र सुरु केले असल्याचे काते यांनी सांगितले.

संबंधीत पोलीस ठाण्याने या संदर्भात तपास करुन सदर तक्रार ही खोडसाळ असल्याचे स्पष्ट केले असल्याचे काते म्हणाले. मंडणगड पोलीसांनी या प्रकऱणात या संदर्भात त्यांची तक्रार नोंदवण्याचे पुढे कोणतीही कार्यवाही अद्याप केलेली नसल्याचे काते यांनी सांगीतले. संबंधीत पत्रकार व वेळोवेळी त्रास देणारा विशाल मालवणकर यांचे विरोधात लवकरात लवकर रितसर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी काते यांनी यावेळी केली.

याबाबत मंडणगड पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांना विचारणा केली असता त्यांनी काते यांचा तक्रार अर्ज आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यामुळे पोलीसांनी या संदर्भात गतीने कारवाई करावी अशी मागणी श्री. काते यांनी केली आहे.