
मंडणगड : माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या जंयती निमीत्त वणंद व भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे आंबेडकर यांचे आंबडवे या गावी राज्यभरातून आलेल्या हजारो अनुयायांचे यंदा मोफत चहा, नाष्ठा, जेवण व आरोग्य सुविधेसह कव्वालीचे कार्यक्रमाने स्वागत करण्यात आले. रिपाईचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे व तालुका शाखेच्यावतीने या लोकपयोगी उपक्रमांचे आयोजन रमाई जंयत्तीचे पुर्वसंध्येपासून सुरु करण्यात आले होते.
७ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील हजारो अनुयाई माता रमाईंचे वणंद या मुळगावी दाखल होतात व बाबासाहेबांच्या आंबडवे या मुळ गावी भेट देतात. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील कानाकोऱ्यातील आंबेडकरी अनुयाई ६ व ७ फेब्रुवारी या दोन दिवसात दोन तालुक्यात दाखल होतात. प्रवासातील त्यांची गैरसोय दूर व्हावी, त्यांचा प्रवासाचा क्षीण कमी व्हावा या करिता आदेश मर्चंडे गेल्या तीन वर्षापासून मंडणगड - दापोली फाटा, भिंगळोली येथे मोफत चहा, पाणी, नाष्ठा, जेवण, स्वच्छतागृह व प्राथमिक वैद्यकीय सुविधा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) तालुका मंडणगड यांच्यावतीने उपलब्ध करून देत असतात यंदा या कार्यक्रमाबरोबरच भिम गीते गायनाचा कार्यक्रमही आयोजीत करण्यात आला होता. व 6 फेब्रूवारीपासून अनुयायांचे आगमानास सुरुवात झालेली आहे.
मंडणगड येथे करण्यात आलेल्या पाहूणाचाराने अनुयाई भरावून गेलेले दिसून आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) राज्य कार्यकारिणी सदस्य दादासाहेब मर्चंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस, नगरसेवक आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष नागसेन तांबे, सरचिटणीस रामदास खैरे, जिल्हा संघटक विजय खैरे, किरण पवार, युवक अध्यक्ष संकेत तांबे, संकेश कासारे, गौरव मर्चंडे, विधान पवार, आकाश पवार, सुनील तांबे यांच्यासह पार्टीचे सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. दरम्यान तालुक्यातील पहीली दिक्षाभूमी टाकेडे व बाबासाहेबांचे मुळ गाव आंबडवे येथेही जयंत्तीचे निमीत्ताने विविध कार्यक्रमांचे आय़जोन करण्यात आले होते. शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर, दीपक मालुसरे, अस्मिता केंद्रे, भाजपा तालुका अध्यक्ष अप्पा मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश शिगवण, विश्वदास लोखंडे, अँड मिलींद लोखंडे, अजय दळवी, काजल लोखंडे, संजीव जाधव, पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रमास भेट देऊन उपक्रमांचे कौतूक केले.