
कणकवली : तालुक्यातील फोंडाघाट येते रानडुकराचे मांसविक्री करत असणाऱ्या दोन इसमांना वनविभागाच्या वतीने कारवाही करत ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 35 ते 40 किलो रानडुकराचे मांस विक्री करताना मिळाले आहे. ही कारवाई फोंडाघाट कासारवाडी बाबीचे भाटले येथे दुपारी 2 च्या सुमारास करण्यात केली. उप वनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी व सहाय्यक वन संरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुंनकीकर, वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक अतुल खोत, अतुल पाटील, सुधाकर सावंत यांनी बुधवार दुपारच्या सत्रात ही कारवाही केली.
यामध्ये गुरुनाथ मधुकर ऍंडे ,चंद्रकांत शिरवलकर दोघे राहणार बाबीचे भाटले कासारवाडी असून त्यांनी दिलेल्या जबाबात घाट माथ्यावरील म्हणजेच राधानगरी मधील एक इसमाने रानडुकरची शिकार केली व आपल्याला मांस विक्रीसाठी दिले असंल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेमकी शिकार कोणी केली कधी केली.? कुठे केली याचा उलगडा वनविभागाच्या तपासात होणार आहे.