मठ येथील प्रवेश केलेल्या "त्या"कार्यकर्त्यांचा भाजपशी संबंध नाही

मठ भाजप पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
Edited by: दिपेश परब
Published on: October 31, 2025 17:18 PM
views 452  views

वेंगुर्ला : मठ येथील भाजपचे युवा मोर्चा पदाधिकारी समीर नाईक व कार्यकर्ते तसेच माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य महादेव उर्फ बंटी गावडे यांनी गुरुवारी कुडाळ येथे आयोजित मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

याबाबत या प्रवेशकर्त्यांचा भाजपशी काही संबंध नसून माजी आमदार राजन तेली यांच्या सोबत ११ महिन्यांपूर्वी हे ठाकरे शिवसेनेत गेल्याने त्यांच्यावर भाजप पक्षाकडून कारवाई करण्यात आली होती. आणि आता ते शिवसेनेत गेले. गेले काही महिने त्यांना भाजपच्या कोणत्याही सभेला, बैठकीला बोलावण्यात आले नव्हते त्यामुळे त्यांचा भाजपशी काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया भाजप मठ चे बूथ अध्यक्ष अनिल तेंडोलकर आणि उमेश धूरी यांनी दिली आहे.