पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी

Edited by: मनोज पवार
Published on: October 20, 2024 14:24 PM
views 267  views

चिपळूण : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.  शनिवारी संध्याकाळी बहादूरशेख नाका येथे नाकाबंदी करीत पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक नुकतीच जाहीर झाले असून या निवडणुकीत अवैध दारू वाहतूक, अवैध रोकड बाळगणे आदी बाबींवर पोलीस प्रशासन लक्ष ठेवून असणार आहे. 

या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी बहादूरशेख नाका येथे नाकाबंदी करत वाहनांची कसून तपासणी केली. या मोहिमेत कोणतीही अवैध बाब आढळून आलेली नाही. मात्र, पोलीस प्रशासन अलर्ट आल्याचे पहावयास मिळाले आहे. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक श्री. हरूगिरे, उपनिरीक्षक श्री.खोपडे, श्री. जाधव पोलीस हवालदार गणेश नाळे आदी सहभागी झाले होते.