
कणकवली : दिल दोस्ती ग्रुपचे माजी खजिनदार राजु ताटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक काळजाला हात घालणारा उपक्रम राबवण्यात आलाय. सांगेली गावातील झोरे कुटुंबातील एकूलता एक कमवता मूलगा कै. हनुमंत नाना झोरे यांचा मंगळवार दि. १२/१०/२०२२ रोजी अंगावर विज पडून मृत्यू झाला. कुटुंबात असलेला एकूलता एक मुलगा असा अचानक गेल्याने झोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. त्यांची घरची परीस्थिती अंत्यंत हलाखीची असल्यामूळे दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने त्यांच्या सांगेली येथे राहत्या घरी जाऊन कुटुंबाची विचारपूस करून अन्नधान्य व आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष शेखर डोईफोडे, सचिव बळीराम कोकरे, खजिनदार दिपक ताटे, उपाध्यक्ष राजेश जानकर, महादेव खरात, राजु ताटे, रमेश शिंदे, विनोद कोळेकर, संजय शिंदे, विनायक जंगले, प्रदिप यादव, लकी डोईफोडे, लक्ष्मण पाटील, जानू पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.उपक्रम राबवण्यात आलाय