
देवगड : देवगडमध्ये आलेल्या संकल्प यात्रेला न.पं.प्रशासनप्रमुख व कर्मचारी उपस्थित असताना मासिक सभेमध्ये सभा सुरू होण्यापुर्वीच समर्पक उत्तरे द्याल काय ? असा प्रश्न विचारून नगराध्यक्षांना विरोधकांनी कोंंडीत पकडल. यामुळे द्विधा मनस्थिती झाल्याने नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्यावर न.पं.च्या इतीहासामध्ये प्रथमच मासिक सर्वसाधारण सभा रद्द करण्याची मोठी नामुष्की ओढवून घ्यावी लागली.
देवगड जामसंडे न.पं.ची मासिक सर्वसाधारण सभा गुरूवारी सायंकाळी ४ वाजता न.पं.सभागृहात आयोजित करण्यात आली होती. मात्र, याच दिवशी विकसित भारत संकल्प यात्रा देवगडमध्ये असल्याने मुख्याधीकारी व प्रमुख कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थितत होते. तर नगराध्यक्षा साक्षी प्रभू या संकल्प यात्रेच्या ठीकाणी जावून आल्या व न.पं.सभेसाठी सभागृहात दाखल झाल्या. संकल्प यात्रेचे परिपत्रक मंगळवारी प्रशासनला मिळाले होते. मात्र हे परिपत्रक प्रशासनाला मिळूनही नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना बुधवारी सायंकाळी ७ वाजता देण्यात आले होते. यामुळे सात दिवस अगोदर सभेचा अजेंडा निघाला असल्याने त्यानुसार सभा गुरूवारी सायंकाळी ४ वाजता घेण्यात आली होती. परंतू, संकल्प यात्रेसाठी प्रशासनमधील प्रमुख अधीकारी व कर्मचारी उपस्थित असल्याने तसेच या यात्रेला भाजपा नगरसेवक व उपनगराध्यक्षा मिताली सावंत या देखिल उपस्थित असल्याने सभास्थळी फक्त नगराध्यक्षा साक्षी प्रभू व शिवसेना नगरसेवक उपस्थित होते. एक तासांनी विरोधी नगरसेवक सभास्थानी दाखल झाले. यावेळी या नगरसेवकांनी सभा सुरू करण्यापुर्वी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना प्रशासन प्रतिनिधी उपस्थित नसताना सभेत विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देत असाल तरच सभा घ्या असे सांगून चांगलेच कोंडीत पकडले.
तर दुसरीकडे शिवसेना नगरसेवक सभा घ्या असे सांगत होते. यावेळी नगराध्यक्षा यांनी मुख्याधीकारी यांना फोन करून विचारले. मात्र, शासनाचा कार्यक्रम असल्याने ते त्या कार्यक्रमात उपस्थित राहील्याने सभेला आले नाहीत. त्यांनी मुख्याधीकारी यांना प्रतीनिधी पाठविण्यास सांगीतले. मात्र त्यांच्यासहीत मुख्य कर्मचारी संकल्प यात्रेच्या ठीकाणी असल्याने आले नाहीत. नगराध्यक्षांनी वारंवार त्यानंतर त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्वांचेच फोन बंद लागत होते. एकीकडे विरोधक त्यांना सभा घेता की नाही ते सांगा अन्यथा रद्द करा असा तगादा लावत होते. तर दुसरीकडे प्रशासनातील अधीकारी विशेषत: सचिव असलेले मुख्याधीकारी उपस्थित नसल्यामुळे विरोधकांचा प्रश्नांना तोंड कसे द्यायचे या विवंचनेत असलेल्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी अखेर त्यांची वाट पाहून सभा रद्द करीत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी सभेला सचिव उपस्थित न झाल्याने प्रशासनाकडून कोणीही प्रतिनिधीन उपलब्ध करून न दिल्याने तसेच प्रशासनाकडून अधीकारी व कर्मचारी यांचे मोबाईल बंद असल्याने आजची सभा रद्द करीत असल्याचे जाहीर केले व सभा रद्द करण्यात आली.
दरम्यान सभा रद्द झाल्यानंतर सर्व नगरसेवक व नगराध्यक्षा सभागृहाबाहेर पडल्यानंतर मुख्याधिकारी सुरज कांबळे हे न.पं.दाखल झाले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या दालनामध्ये मुख्याधिकारी यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सभा घेणे, तहकूब करणे हा अंतीम निर्णय अध्यक्षांचाच असतो असे सांगीतले. सभेबाबत प्रशासनाकडून आवश्यक असलेली टीपणी ही सभेनंतरही केली असती असे सांगितले. यामुळे प्रशासन उपस्थित नसलेल्या स्थितीत दुसरीकडे विरोधकांनी गुगली टाकून कोंडीतत पकडल्यामुळे देवगड नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांना न.पं.च्या इतीहासात प्रथमच सर्वसाधारण सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली आहे.