असा झाला एसटीएस परीक्षेचा बक्षीस वितरण सोहळा...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 31, 2023 10:27 AM
views 239  views

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2023 चा बक्षीस वितरण समारंभ आज मराठा समाज हॉल, कुडाळ येथे संपन्न झाला. 

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रत्येक इयत्तेतील पाहिल्या ५० अशा २५० गुणवंत विद्यार्थ्यांना   2.50 लाख रुपयांची रोख पारितोषिके,सन्मानचिन्ह, व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 6वी व 7 वी  प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना लॅपटॉप व २ री, ३ री , ४ थी च्या आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यावेळी  प्राथमिक विभागातून अमोल गोसावी व  माध्यमिक विभागातून सद्गुरु सटेलकर यांना युवा संदेश आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी संग्राम देसाई (उपाध्यक्ष बार कौन्सिल महाराष्ट्र- गोवा) , दीपलक्ष्मी पडते, माजी जि. प. अध्यक्ष, प्राजक्ता शिरवलकर, नगरसेविका , संदेश उर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत, अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान , विनायक राणे माजी नगराध्यक्ष कुडाळ, राजेश पडते, राकेश कांदे,विजय भोगटे, संजय सावंत, महेंद्र सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रस्ताविक करताना युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोट्या सावंत यांनी पुढील वर्षा पासुन सिंधुरत्न टॅलेन्ट सर्च परीक्षा इंग्लिश मध्यामातही  सुरू करणार असे सांगितले.

तसेच यावर्षी ४थी,६वी व ७ वी परिक्षेत प्रत्येक इयत्तेतील पहिल्या ५ अशा १५ गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून विमानाने इस्रो येथे भेटी साठी नेण्याचे जाहीर केले. तसेच २ री व ३ री परीक्षेतील पहिल्या ५ अशा १० विद्यार्थ्याना गोवा येथील सायन्स सेंटर ला भेटी साठी नेण्याचे जाहीर केले. आमदार नितेश राणे साहेब यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करताना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संग्राम देसाई यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे आनंद झाला असून तरुणांनी संदेश सावंत यांच्या कडून प्रेरणा घेउन सामजिक व शैक्षणिक कार्य करावे असे सांगितले.प्रतिष्ठानच्या उपक्रमांना शुभेच्छा देताना पुढे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.