...हा स्टाॅलधारकांंच्या एकजुटीचा विजय : जयेंद्र रावराणे

आ. राणे यांनी शहरातच स्टाॅलधारकांचं पुनवर्सन करणार असल्याचा दिला शब्द
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 14, 2023 11:55 AM
views 316  views

वैभववाडी : शहरातील स्टॉलधारकांच्या बाबतीत चिघळलेला विषय आ. नितेश राणे यांनी यशस्वीपणे सोडविला आहे.आ.राणे यांनी शहरातच स्टाॅलधारकांच पुनवर्सन करणार असल्याचा शब्द दिला. स्टॉलधारकांच्यावतीने आम्ही त्यांचे आभार मानतो. हा सर्व स्टॉलधारकांच्या एकजुटीचा विजय आहे, असे मत स्टाॅल संघटनेचे नेते जयेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले. 

नगरपंचायतच्या कार्यालयात स्टॉलधारक व आमदार नितेश राणे यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी सर्व स्टॉल धारकांशी सकारात्मक चर्चा केली. तसेच सर्व स्टॉल धारकांना शहरात जागा दिली जाईल, असा शब्द दिला. तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल धारकांना शासकीय गोदाम व गणपती विसर्जन घाट या परिसरात स्टॉलसाठी जागा देण्यात येणार आहे, असे आमदार राणे यांनी सांगितले. त्यांनी दिलेला शब्द सर्व स्टॉल धारकांनी मान्य केला. अखेर यासंदर्भात गेले किती दिवस स्टॉल धारकांचे नेतें जयेंद्र रावराणे यांनी लावून धरलेली मागणी पूर्ण झाली आहे. स्टाॅलधारकांना शहरातच स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे स्टॉलधारक देखील समाधानी आहेत. आ.नितेश राणे यांनी आज ख-या अर्थाने स्टालधारकांना न्याय दिला आहे.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या स्टाॅल धारकाबाबत पालकमंत्री असताना महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्याच पद्धतीने आज आ.राणे यांनी भुमिका घेतली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसाच्या या लढ्याला यश आले आहे. हा सर्व स्टॉल धारकांच्या एकजुटीचा विजय आहे. तसेच हा विषय योग्य पद्धतीने आ.राणे यांनी सोडविल्याबद्दल आम्ही सर्वजण आभारी आहोत, असे रावराणे यांनी आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर सांगितले.