मणेरीत सातेरी मंदिराची फंडपेटी चोरट्यांनी केली लंपास

Edited by: संदीप देसाई
Published on: July 04, 2023 11:17 AM
views 332  views

दोडामार्ग : जिल्ह्यात घर व मंदिरातील फंड पेटी चोरीचे सुरू असलेले लोण आता दोडामार्ग तालुक्यात सुद्धा पोहचले आहे. मणेरी येथील सातेरी मंदिरातील दरवाजा तोडून आतील मंदिराची फंडपेटी चोरट्यांनी लंपास केली आहे. सोमवारी ही घटना उघडकीस आली असून पोलिसात याबाबत फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला असून ठसेतज्ञ यांनी दरवाजा वरील ठसे नमुने घेतले आहेत. मात्र दिवसेंदिवस वाढत चाललेले हे चोरीचे लोण जिल्हा वासियांना दोखेदुखी बनली असून या चोरट्यांना गजाआड करण्याचे मोठ आवाहन पोलिसांसमोर आहे.