जिल्ह्याच्या राजधानीत चोरांचा वावर

एका बंगल्यासह पाच फ्लॅट केले लक्ष
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 30, 2024 14:44 PM
views 93  views

सिंधुदुर्गनगरी : चोरट्यांनी आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीला लक्ष केले असून,या नागरी  येथील बंद असलेला एक बंगला आणि बंद असलेले पाच फ्लॅट लक्ष्य केले. यापैकी एका फ्लॅट मधील रोख रक्कम आणि कानातील सोन्याची कुड्डी चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. दरम्यान रात्री उशिरा गायायत देवदास देसाई यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. ओरोस येथील मुंबई-गोवा महामार्गालगतच ओरोस रवळनाथ मंदिर समोरील

आनंदी निवास या बंगलो मध्ये चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी समोर आली. त्यानंतर याच बंगल्याला लागून असलेल्या स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या ए बिग मधील ३ आणि बी विंग मधील १ तर आनंदी निवासच्या दुसऱ्या यजूला लागून असलेल्या बसंत रेसिडेन्सी मधील एक फ्लॅट फोडला असल्याचे निदर्शनास आले. आनंदी चंगलो मधील सर्व माणसे मुंबई येथे राहतात, तर त्यांचाच एक नातेवाईक रात्रीचा अभ्यास करायला येथे येतो नेमका बुधवारी रात्री ती तेथे आला नव्हता. गुरुवारी सकाळी तो तेथे आला तेव्हा त्याला बंगलोच्या मुख्य दरवाजाच्या सुरक्षिततेसाठी बसविलेल्या कोलॅप्सेबल डोअर व त्याच्या आतील मुख्य दरवाजाचे लॉक तुटुन खाली पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या यायतची माहिती पोलिसांना देण्यात आली, तसेच बसंत रेसिडेन्सी मधील मंजिरी सरबळकर यांचा क्लास चा फ्लॅट, स्वामी समर्थ व्या ए आणि बी विंग मधील फ्लॅट यांचीही पाहणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र या सर्व फ्लॅट मध्ये भाडेकरू व कामगार राहत असल्याने व सकाळच्यावेळी माहिती देण्यासाठी कोणीच फ्लॅट धारक उपलब्ध नसल्याने नेमके चोरीला काय गेले हे स्पष्ट होऊ शकले नाही, सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल प्रदीप गोसावी आणि पोलिस

नाईक भक्ती सावंत यांनी सर्व घटना स्थळांची पाहणी केली, तर सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मागाडे, हेड कॉन्स्टेबल संतोष सावंत, पोलिस नाईक श्री. खडपे, श्री. सोनावणे या टसे तज्ञांच्या टीमने ही पाहणी केली आहे. कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. तर बंगलोचा कोलॅप्सेबल डोजर तोडण्यासाठी कटर वापरल्याचा अंदाज असून हे चेरटे सराईत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. आनंदी निवास बंगलो ला लागून असलेल्या स्वामी समर्थ रेसिडेन्सी मधील कालिका स्टील अॅन्ड सिमेंट यांच्या दुकानातील सीसीटीव्ही मध्ये रात्रीच्या वेळी दोन अनोळखी व्यक्ती इकडून तिकडे जातांना दिसून येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर याच रेसीडेंसीच्या बी बींग मधील जीन्यातून दोन बुरखाधारी व्यक्ती संशयास्पदरित्या जीना चढून जात असताना तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत,

सायंकाळी उशीरा तक्रार दाखल स्वामी समर्थ रेसीडेन्सी मधील मुळ्ये यांच्या फ्लॅट मध्ये भाड्याने राहत असलेल्या सत्यवान देसाई यांचा फ्लॅट लक्ष्य झाल्याने आणि ते मुंबईत असल्याने सायंकाळी उशिरा त्यांचा भाऊ देवदास देसाई यांनी सत्यवान देसाई राहत असलेल्या फ्लॅट मध्ये चारी झाल्याची तक्रार पोलिसात दिली असून रोख १५०० रूपये आणि एक कानातील सोन्याची कुडी चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले असल्याचे पोलिसांकडुन सांगण्यात आले.

या परिसरात चोऱ्या रोखण्यासाठी सिंधुदुर्गनगरी पोलिसांकडून रात्रीची गस्त घातली जाते. मात्र यामध्ये वाढ करावी अशी मागणी नगरिकांकडून केली जात आहे. तर येथील जिल्हा बँकेच्या एटीएम मध्ये असलेल्या पोलिस व्हीजिट नोट बुक मध्ये सप्टेंबर २०२३ नंतर व्हीजिट करणाऱ्या पोलिसांची सहीच नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या रोजच्या रात्र गस्तीवरही येथील नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.