शिरगाव धोपटेवाडीत चोरट्यांनी बंद घर फोडले

6 हजार किंमतीचे साहित्य नेले चोरून
Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 06, 2024 11:56 AM
views 164  views

देवगड : घरमालक मुंबईला गेल्यानंतर शिरगाव धोपटेवाडी येथील बंद घर फोडून घरातील ग्रास कटर, हँड ग्रँडर आणि हॅमर डीलर मशीन साहित्य चोरून नेल्याची घटना 2 नोव्हेंबर रोजी निदर्शनास आली.या चोरीप्रकरणी घरमालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, संतोष अशोक वाडये रा.शिरगाव वरची बाजारपेठ हे दि. 28 सप्टेंबर रोजी त्यांचा शिरगाव धोपटेवाडी येथील घराला कुलूप करून मुंबईला गेले.30 ऑक्टोबर रोजी मुंबईहून ते शिरगाव येथे आले.त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वा.सुमारास ते आपली चारचाकी गाडी घेवून धोपटेवाडी येथील घराकडे गेले. यावेळी त्या घराचा दर्शनी दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी कोणत्यातरी हत्याराने उचकटून घरात प्रवेश करून घरात ठेवलेला 5 हजार रूपये किंमतीचा ग्रासकटर, 500 रूपये किंमतीचा हँड ग्रँडर व 500 रूपये किंमतीची हॅमर डीलर मशीन चोरून नेल्याचे निदर्शनास आले. 

याबाबत त्यांनी देवगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास स.पो.उपनिरिक्षक राजन जाधव व पो.हे.कॉ.महेंद्र महाडिक करीत आहेत.