
शक्तीपीठ महामार्ग विरोधात सभा
सावंतवाडी : सिंधुदुर्ग सारखा निसर्ग तयार व्हायला अडीच हजार वर्ष लागतात. त्यामुळे हे होऊ देता नये. आपल्याला आपल्या निसर्गाची किंमत नाही. इतर देशांत ती जपली जाते. जीडीपी वाढवायला ताजमहाल खोदणार का ? त्या खाली असलेल्या गोष्टीन जीडीपी वाढेल. जग आपल्याला मुर्खात काढेल असं मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.
तसेच काही लोक सांगतातयत ३० किमीचा बोगदा आहे असं सांगत आहेत. हे कदापि होऊ शकत नाही. जनतेला फसवण्याच काम होत आहे. झाड कापली जाणार हे सांगितले जात नाही. झाड कापली जाणार हे सांगायला का घाबरता ? असा सवाल डॉ. परूळेकर यांनी केला. झालेली कत्तल भरून निघणारी नाही. त्यामुळे गावागावात चला, जनजागृती करा असं आवाहन केलं. विकासाच्या नावावर बोलणारी लोक पक्ष बदलून मोकळी होणार, आपलं गाव भकास होणार असंही ते म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गा विरोधात आयोजित सावंतवाडी येथील सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे, कॉ संपत देसाई, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसरकर, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर, प्रसाद पावसकर, रूपेश राऊळ आदी उपस्थित होते.