
सावंतवाडी : माजगाव ग्रामपंचायतीतील भाजप बाळासाहेबांची शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडीत काटेकी टक्कर होत आहे. मतदानाला सुरुवात झाली असुन मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या लढतीत बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून युतीच्या डॉ. अर्चना अजय सावंत यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. तर भाजप नेते मनोज नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत यांनी अर्चना सावंत विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी युतीच्या उमेदवार डॉ. अर्चना सावंत, भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, पिंट्या देसाई आदी उपस्थित होते.