
सिंधुदुर्ग : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अडाळी बाबत जो उद्या लाँग मार्च काढला जातोय 'त्या' औद्योगिक वसाहत आणि प्रकल्पाविषयी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी निवेदन केले आहे. श्रीपाद नाईक यांच्या आयुष्य मंत्रालयाला ५० एकर जागा देण्यात आली आहे. तर १३ जुलै २०२३ ला २१० कोटींचा प्रकल्प हा ३२५ लोकाना रोजगार देणारा प्रोजेक्ट आम्ही आणत असून त्याचा करार येत्या सात ते आठ दिवसात होणार आहे. २४ प्लाॅटचे वाटत ह्या लाॅग मार्च मोर्चाच्या आधी झाली आहे. येथील स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी येथील जागेचे दर कमी करण्यात यावे अशी मागणी आमच्याकडे केल्यानंतर आमच्या उद्योग बोर्डाकडे हा विषय आम्ही ठेवलेला आहे. असं उदय सामंत म्हणाले.
आडाळीत इन्फ्रास्ट्रक्चर साठी २२ कोटी दिलेत तर पाण्यासाठी पाच कोटी दिले आहेत. आडाळीचे कुठलेही काम थांबलेले नसून ज्या आमच्या मित्रपक्षानी पत्रकार परिषद घेवून जो लाॅग मार्च आयोजीत केलाय त्याआधी माझ्याशी संपर्क साधून माहिती घेतली असती तर त्यांचे गैरसमज दूर झाले असते. आडाळीत जे डेव्हलपमेंट चालू आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली चालू आहे. येत्या काही दिवसात आडाळीत काही प्रकल्प आलेले दिसतील अशी प्रतिकीया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.