मग ठरवू कोणाच्या जीवावर निवडून आलात ते | रुपेश राऊळ यांचं केसरकरांवर टीकास्त्र

Edited by: विनायक गावस
Published on: February 06, 2024 12:02 PM
views 213  views

सावंतवाडी : मंत्री केसरकर हे जर स्वतःच्या हिंमतीवर निवडून आले असतील तर येणाऱ्या निवडणुकीत केसरकर यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज भरावा. मग, पाहू जनतेच्या आशीर्वादाने की शिवसैनिकांच्या जीवावर की तुमच्या कार्यकर्तुत्वावर निवडून आलात. त्यावेळी ते दिसेलच असा पलटवार उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला एबी फॉर्म दिल्यानेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं दिवस-रात्र काम करून निवडून आणल. शिवसेनेच्या आशीर्वादानं आपण निवडून आलात. त्याला मी देखील साक्षीदार आहे. त्यामुळे मंत्री दीपक केसरकारांनी कोण खरं ? कोण खोट याची काळजी करू नये. जनताच येणाऱ्या काळात ते ठरवणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दिसेलच जनता कोणासोबत आहे. आम्ही देखील निवडणुकांची वाट पाहत आहोत असा टोला रूपेश राऊळ यांनी लगावला.