...तर तुमच्या पायच तिर्थ पितो | अमित सामंतांचं खुलं आव्हान

Edited by: विनायक गावस
Published on: July 11, 2023 15:05 PM
views 246  views

सिंधुदुर्ग : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांचे कट्टर समर्थक, फायरब्रॅण्ड नेते, विरोधीपक्षनेते जितेंद्र आव्हाड यांची सावंतवाडी संस्थान मराठा समाज हॉल कुडाळमध्ये सभा होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहेत. 

यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले, ही गर्दी आमच्या दृष्टीने काय आहे ते पत्रकारांना विचारा. देवगड, वैभववाडी, दोडामार्गातून आलेली लोक ही शरद पवारांच्या प्रेमापोटी आलेली आहेत. आज राष्ट्रवादीची ताकद काय आहे ते दिसून आलं आहे. माझ्या चुकीमुळे तिनं तिनं पक्ष बदलणारी आलेली लोक राष्ट्रवादीत आली. आज याच लोकांनी टेंडर मिळवण्यासाठी तिथल्या दरबारात हजेरी लावली आहे. आज त्यांना आव्हान आहे यापेक्षा गर्दी असणारी सभा गांधी चौकात घेऊन दाखवा, तुमच्या पायच तिर्थ पितो. नाहीतर एका बापाची औलात सांगणार नाही. आमच्या दैवतावर शरद पवार यांच्यावर बोलाल तर जशास तसं उत्तर देऊ असा सणसणीत इशारा अमित सामंत यांनी दिला.

 यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, व्हिक्टर डांन्टस, प्रसाद रेगे, शेखर माने आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.