असलदेतील तीन मंदिरात चोरी...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: February 09, 2024 08:28 AM
views 493  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील तीन मंदिरांमध्ये अज्ञात चोरट्याने फंडपेटी फोडत चोरी केली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. चोरट्याने सीसीटीव्हीच्या समोर उलट चालत चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे. सुमारे १० ते १५ हजार रुपये चोरीला गेले आहेत.

यामध्ये असलदे उगवतीवाडी येथील गणेश मंदिर फंड पेटी, माऊली देवी मंदिर फंड पेटी व डामरेवाडी येथील साईबाबा मंदिरातील फंड पेटी अज्ञात चोरट्याने फोडली आहे. तिन्ही ठिकाणच्या फंड पेटी फोडून  चोरट्याने आत असलेली रोकड लांबवली आहे. घटनास्थळी पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत येथून सीसीटिव्ही फुटेज तापासणी केली जात आहे.