
वैभववाडी : शहरातील सांगुळवाडी रोडवर असलेल्या भानुदास दामोदर तावडे यांच्या हॉटेलमधील १५ हजार रूपये किमंतीची टिव्ही अज्ञाताने काल (ता.११) रात्री चोरली.दरम्यान घटनास्थळी आणलेले श्वान शहरातील एका खाजगी इमारतीनजीक जाऊन घुटमळले. अज्ञात चोरटा परप्रांतीय असावा असा पोलीसांचा अंदाज आहे.
श्री. तावडे यांचे शहरातील पुर्व बाजारपेठेत हॉटेल आहे.गुरुवारी रात्री साडेबारा वाजेपर्यत ते हॉटेलमध्ये होते.त्यानंतर लगत असलेल्या घरांमध्ये ते गेले.जाताना त्यांनी नेहमीप्रमाणे हॉटेलला असलेला साधा दरवाजा बंद करून घेतला.आज सकाळी साडेआठ वाजता ते हॉटेलमध्ये आले असता त्यांना टिव्ही चोरीस गेल्याचे लक्षात आले.त्यांनी तत्काळ पोलीसांना ही माहीती दिली.त्यानंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे घटनास्थळी गेले.त्यानंतर गुन्हा अन्वेषण पथक,ठसे तज्ञ पथक देखील वैभववाडीत दाखल झाले.याशिवाय श्वानपथक देखील घटनास्थळी आले.श्वान शहरातील एका खाजगी इमारतीनजीक जाऊन घुटमळले.
दरम्यान अज्ञात चोरटा हा परप्रांतीय असण्याचा प्राथमीक अंदाज पोलीसांकडुन व्यक्त केला जात आहे.या चोरी प्रकरणाचा तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.