३०० किल्ल्यांची भ्रमंती करणारा अवलिया

Edited by: मनोज पवार
Published on: July 30, 2025 14:56 PM
views 180  views

‌‌रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपाकमध्ये राहणारा सुपुत्र दुर्ग वेड्या अवलियाने ३०० किल्ले सफारी व अनेक शिखर आणि जंगल सफारी सर केले. दुर्ग सेवक निखिल जामसंडेकर पेशाने पोस्ट खात्यात मल्टी स्टाफमध्ये काम करत असताना इतिहास व शिवछत्रपती या विषयामुळे आवडीमुळे सुट्टीच्या दिवसात साखरपा मधील युवक व मित्रमंडळींना घेऊन गड संवर्धन इत्यादी कामे करत असत.३०० किल्ल्याची सफर यशस्वीपणे पूर्ण केली. वयाच्या २३ वर्षी किल्ले भ्रमंती करण्यास प्रारंभ केला.आजच्या दिवशी त्याने रत्नागिरी मधील अनेक किल्ले व शिखर सर करून यशस्वी सफारी केली.

चिखली पोस्ट ऑफिसमध्ये सण 2015 पासून तो खात्यात रुजू झाला. त्यानंतर त्याने या यांच्या छंदाला प्रारंभ केला. सध्या तो रत्नागिरी मेन ब्रांच मध्ये पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्रातील कलावंतीण दुर्ग, कळसुबाई, साल्हेर आणि सालोटा यांसारखे ब्रेक लोकांना आव्हानात्मक असणारे किल्ले देखील निखिलने पार केले आहेत. अनेक पुस्तकांवरती पूर्ण अभ्यास करत आहे.

छत्रपतींच्या इतिहासाबद्दल व किल्ल्यांबद्दल असणारे आकर्षण इतिहास विषयाची आवड या छंदाकडे घेऊन गेल्याचे निखिल ने सांगितले. त्याने बी. ए. शाखेमधून आपले पदवीचे शिक्षण केले आहे. त्याचे मित्र दुर्ग सेवक प्रणव मापुस्कर, प्रशांत वैद्य, नरेंद्र जाधव, भाई गांधी, या सहकाऱ्यांचे त्याला सहकार्य भेटते. 

आपल्या संगमेश्वर तालुक्यातील असणारा प्रचित गड त्याचप्रमाणे मुगगड, विजापुरा यासारखे धोकादायक असणारे किल्ले देखील पार केले आहेत. ३०० किल्ल्यांवर न थांबता राज्यात जेवढे किल्ले आहेत तेवढे आपण पूर्ण करणार असल्याचा निर्धार त्याने व्यक्त केला आहे.