शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू !

Edited by: संदीप देसाई
Published on: August 15, 2022 12:38 PM
views 246  views

दोडामार्ग : शॉक लागून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. सासोली हेदुसवाडी येथील 28 वर्षीय विवेक हरिश्चंद्र नाईक असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी दिली. विवेक हा गोव्यात एका खासगी कंपनीसाठी गेले काही दिवस कामासाठी जात होता. आज तो सायंकाळी घरी आला होता. त्यानंतर काम करत असताना हा प्रकार घडला. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, लहान मुलगा भाऊ असा परिवार आहे. विवेकाच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरलीय