
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलामध्ये मोठे योगदान वेगवेगळ्या स्पर्धा परिषदेत आज जिल्ह्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांचे वतीने आयोजित पाल्याचा गौरव सोहळा हा उपक्रम स्तूत आहे असे प्रतिपादन निवृत बॅक अधिकारी विलास मोडक यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा पात्र, इयत्ता १० व १२ वी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले तसेच अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचारी पाल्याचा गौरव माध्यमिक पतपेढी सभागृह सिंधुदुर्ग नगरी येथे करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या कर्मचारी पल्यांचा गुण विशेष गौरव सोहळा संपन्न. यावेळी श्री विलास मोडक सेवानिवृत्त बँक अधिकारी, प्रमुख अतिथी अंकिता मोडक सहायक शिक्षक पाट हायस्कूल, डॉक्टर श्रीराम दीक्षित शिरोडा, गायत्री सातोसकर माजी उपसरपंच रेडी, प्रमोद खांडेकर शिरोडा, दत्तात्रय पाटील धामणवाडी कोल्हापूर, अनिल राणे जिल्हाध्यक्ष, प्रदीप सावंत कार्याध्यक्ष, गजानन नानचे सचिव, धनश्री गावडे उपाध्यक्ष, सुहास देसाई उपाध्यक्ष, शरद कांबळे वैभववाडी, आदी उपस्थित होते.
जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार
दशरथ घाडी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मडूरा हायस्कूल जीवनगौरव पुरस्कार
दत्तात्रय पाटील मुख्याध्यापक विद्यामंदिर धामणवाडी तालुका राधानगरी जीवनगौरव पुरस्कार
प्रियंका तांबे मुख्य लिपिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सिंधुदुर्ग
कार्य तत्पर पुरस्कार
निशा परीट वरिष्ठ लिपिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक सिंधुदुर्ग
कार्य तत्पर पुरस्कार देण्यात आले.
शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे कायमच विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यानिमित्त अंकिता मोडक यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर टाळावा व व्यायाम व अभ्यासाकडे लक्ष द्यावे त्याचबरोबर पोषक आहार सुद्धा घ्यावा असे सुचित केले त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर श्रीराम दीक्षित यांनी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे राविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष यांनी केले असून जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी पाल्यांच्या गुणगौरव कार्यक्रम मोठ्या संख्येने शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित असल्याने सगळ्यांना धन्यवाद देऊन संघटनेवरच प्रेम करा असे आवाहन केले. कार्यक्रम सूत्रसंचालन विजय गवस यांनी तर आभार वैभव केंकरे यांनी यांनी मानले.