कणकवली टु व्हिलर मेकॅनिकल असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद : सुशांत नाईक

पशु - पक्षांसाठी ठेवणार पाण्याची भांडी
Edited by:
Published on: April 01, 2025 16:53 PM
views 837  views

कणकवली : आता सध्याच्या कडक उन्हाळयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोकाट जनावरे, पशु-पक्षी यांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने कणकवली टु व्हिलर मेकॅनिकल असोसिएशन यांच्या वतीने व WFV (वॉटर फॉर व्हाईसलेस या संस्थेच्या सहकार्याने टु व्हिलर मेकॅनिकल यांनी आपल्या गॅरेज च्या बाहेर शुद्ध पाण्याच्या भांडी ठेवून सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. टु व्हिलर असोसिएशनचा प्रत्येक सभासद आपल्याला गॅरेज जवळ हे पिण्याचे भांडे ठेवणार आहे. जेणेकरून मोकाट फिरणाऱ्या प्राण्यांना पाणी उपलब्ध होईल. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी यांच्या कार्याचे कौतुक केले. आ

ता सध्या ई-बाईक मुळे टु व्हिलर मेकॅनिकलवर मोठे संकट ओढवलं आहे, आपण स्वतः अडचणीत असून देखील एक सामाजिक माणुसकीतून पशु-पक्षी यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करून यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत ही पाण्याची भांडी ठेवण्यात आली.

 यावेळी टू व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन कणकवलीचे अध्यक्ष प्रथमेश परब, खजिनदार दशरथ चव्हाण, संदीप पारकर, सचिव गणेश सावंत, प्रशांत बाणे, अमोल सावंत, किशोर कांबळे, गजानन धाकोरकर, महेश चिंदरकर उपस्थित होते.